आमदार अनुप अग्रवाल यांनी शिवस्मारकाच्या कामाची केली पाहणी




शहरातील मालेगाव रोडवरील  मनोहर चित्रमंदिर समोर महानगरपालिका आणि शासनाच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे ५४ फूट उंचीचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.शहरातील सर्वात मोठ्या स्मारकामुळे शहराच्या वैभवात निश्चितपणे भर पडेल .असा विश्वास शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पाहणी वेळी व्यक्त केला.या स्मारकाचे काम येत्या शिवजयंतीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. असेही म्हटले आहे या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली आहे.या कामाची पाहणी आ.अनुप अग्रवाल यांच्याकडून करण्यात आली. या प्रसंगी त्यांनी स्मारकाच्या कामाची माहिती घेतली .येत्या  शिवजयंतीला या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.यावेळी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर ,सुनिल बैसाणे, शशी मोगलाईकर ,आकाश परदेशी ,संदीप बैसाणे,यशवंत येवले, अजय अग्रवाल,पंकज धात्रक, महानगरपालिकेचे अभियंता चंद्रकांत उगले,ठेकेदार मिलिंद मुळावद आदीसह उपस्थित होते.