४ दिवसापासून जी एस ग्राउंड वर पाळधी आगग्रस्त २२ दुकानदार व जळगाव जिल्हा एकता संघटनेमार्फत दुकानदारांना नुकसान भरपाई व आरोपींना त्वरित अटक करा या दोन मागणीसाठी साखळी उपोषण सुरू असून चौथ्या दिवशी या उपोषण स्थळी सर्व धर्मीय व सर्वपक्षीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या आंदोलनाला आपले समर्थन दिले. फक्त समर्थन न देता ते प्रत्यक्षात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
शासकीय नुकसान भरपाई व आरोपींना अटक करा या मागणीचा गांभीर्याने दखल घेतली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले .
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व धर्मीय सर्वपक्षीय नेते यांना आपत्ती व्यवस्थापनाची शासकीय प्रणाली समजून सांगून य आगग्रस्त दुकानदाराची नुकसान भरपाई शासनाला जानेवारी च्या सादर करण्यात येणाऱ्या अहवालात नमूद करतो तसेच आरोपींना अटकेसाठी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे असे आश्वासन दिले. उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सोडावे व आमरण उपोषण करू नये अशी सुद्धा विनंती केली.
चौथ्या दिवशी भेट देऊन समर्थन देणारे सर्व धर्मीय व सर्वपक्षीय नेते
काँग्रेसचे प्रवक्ते मुफ्ती हारून प्रमोद बापू पाटील,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जळगाव जिल्हा, जगन भाऊ सोनवणे, भुसावळ, मुकुंद भाऊ सपकाळे,जळगाव, अशोक लाडवंजारी, जिल्हाध्यक्ष महानगर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार,सुनील भाऊ माळी,माजी नगरसेवक, सुरतचे नगरसेवक सुरेश सोनवणे, फैजपूरचे दलित नेते आरिफ शेख,राजू भाऊ मोरे, माजी नगरसेवक, रमेश पाटील,प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक, अशोकराव पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जळगाव, वाय एस महाजन सर,जिल्हाध्यक्ष सेवा दल राष्ट्रवादी, रमेश बहारे,महानगर अध्यक्ष सामाजिक न्याय राष्ट्रवादी, चंद्रकांत चव्हाण, तालुका अध्यक्ष संविधान आर्मी, विजय पवार, ग्रामीण तालुकाध्यक्ष संविधान आर्मी, सुभाष कोंडाजीराव पवार, चंद्रकांत चव्हाण, राष्ट्रवादीचे एजाज मलिक, काँग्रेसचे बाबा देशमुख, मनसे जमील देशपांडे,आदिल खर्चे, रहीम तडवी, रमेश पाटील, विशाल देशमुख, सुभाष पवार, अशोक पाटील, डॉक्टर रिजवान खाटीक, मजहर खान, जमील शेख, सोनवणे, यासह सुमारे २२७ लोकांनी प्रत्यक्ष भेटून आपले समर्थन दिले.

Social Plugin