धुळे - शहरातील मार्केट यार्ड परिसर लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळ संचलित मार्केट यार्ड लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
तसेच संक्रांताच्या अनुषंगाने हळदी - कुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील झाला. महिलांना भेट वस्तू देण्यात आले. या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करित दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक दिपाली दोडे यांनी केले. तर सूत्रसंचालन उज्वला अनिल अलई यांनी केले होते. यावेळी मार्केट यार्ड परिसर लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळांच्या पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी आ.अनुप अग्रवाल यांच्या भव्य सत्कार केला. कॅन्सरतज्ञ डॉ. भूषण नविनचंद्र वाणी यांचे कॅन्सर रोगावर अनमोल मार्गदर्शन करताना म्हटले की, पीपीटीद्वारे साजरीकरण करून कॅन्सर आजाराचे लक्षणे, त्यावर उपाय योजना करित काळजी घेण्यांची गरज आहे. सर्व महिलांनी मनातील भीतीदूर केली पाहिजेल. असे डॉ. वणी यांनी सांगितले. सदर कार्यक्रम शहरातील वाखारकर नगर परिसरातील पवन नगर येथील प्रसन्न हनुमान मंदीराच्या आवारात संपन्न झाला. मार्केट यार्ड परिसर लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही हळदी कुंकूच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सांस्कृतीक कार्यक्रमात आराध्या भूषण येवले,उर्वी देशमुख, ओवी दोडे कार्तिक नेरकर,वंशिका नेरकर, ईश्वरी देशमुख,आराध्या नेरकर स्वामिनी नावरकर, वैष्णवी दोडे भैरवी वाणी, खुशी कोठावदे, अनुष्का दशपुते, मनस्वी शिनकर,आदिती खैरनार, अनुष्का नेरकर, नेहा दुसे, श्रावणी दुसे या चिमुकल्यांनी देशभक्तीपर सामाजिक प्रबोधनपर गीतांवर नृत्य सादर केले. मनिषा नानकर, मिना सोनजे,अनिता दुसे यांनी मंगळा गौर या गीतावर समूह नृत्य सादर केले. सुवर्णा नानकर यांनी दाताच दातवन हे भारुड गायिले. धृती नावरकर, निलिमा कोठावदे,निशा शिनकर,पल्लवी कोठावदे, तृप्ती सोनजे, दिपाली दोडे या महिलांनी नारी शक्ती या गीतावर समूह नृत्य केले. आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन महिलांनी सहभाग घेऊन आनंद लुटला होता. या कार्यक्रमाचे आयोजन महिला अध्यक्षा मनीषा नानकर, उपाध्यक्षा शोभा खैरनार, सचिव उज्ज्वला अलई, सदस्या योगिता येवले,धृती नावरकर,निलिमा कोठावदे, अनिता दुसे, स्वाती नावरकर, प्रतिभा ब्राह्मणकर, अनिता माकडे, वैशाली अमृतकर, निलीमा कोठावदे, सुवर्णा नानकर, दिपाली दोडे, रजनी शिरोडे,मिना सोंजे,वैशाली अमृतकर,कल्पना येवले तसेच मार्केट यार्ड परिसर लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ वाणी, उपाध्यक्ष अजय कासोदेकर, सचिव मुरलीधर नानकर,सदस्य सुभाष येवले,दिलीप माकडे, प्रविण येवले, मनोज ब्राम्हणकर, दिनेश नावरकर,प्रविण दूसे,नरेंद्र बाळकृष्ण देशमुख,प्रदीप निंया शिरोडे,लक्ष्मीकांत श्रीकांत शिनकर,राजेंद्र काशिनाथ कोठावदे,देविदास अमृतकर, राजेंद्र अमृतकर यांच्यासह समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin