आंबेडकर नगर येथील बलभीम व्यायाम शाळेच्या कामाची चौकशी करा- सतीश गायकवाड यांचे आयुक्तांना निवेदन नीकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अभियंता व मक्तेदार यांच्यावर कारवाई करा निवेदनातुन मांगणी

 



आंबेडकर नगर येथील बलभीम व्यायाम शाळेच्या कामाची चौकशी करून नीकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अभियंता व मक्तेदार यांच्यावर कारवाई करण्यात अशा मांगणीचे निवेदन मानव अधिकार संरक्षण समितीचे जळगाव महानगर अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी आयुक्तांना दिले आहे. निवेदनातं त्यांनी म्हटले आहे की, 




जुने जळगाव आंबेडकर नगर येथील बलभीम व्यायाम शाळा, समाज मंदिराचे मनपा निधीतून  गेल्यावर्षी कलरिंग तसेच रिपेरिंगचे काम करण्यात आले होते. मात्र हे काम अत्यंत नीकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. याठिकाणी समाज मंदिराच्या गच्चीवर फिनिशिंग करण्यात आलेली नाही. तसेच कलरिंग केल्यानंतर काही महिंन्यातच कलरचे पोपळे खाली पडत आहे. त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे  करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. सदरील कामाची चौकशी करून  संबंधित अभियंता, व मक्तेदार यांच्यावाई कारवाई करण्यात यावी. अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे.