धुळे शहरातील प्रभाग 11 परिसरात नव मतदार नोंदणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य मतदान नोंदणी अभियान राबविण्यात येत असून, त्याचा शुभारंभ बुधवारी रोजी नारळ फोडून करण्यात आला. या अभियानाचे आयोजन शिवसेनेचे पंकज दादा भारस्कर आणि सागरभाऊ निकम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्रद्धा कॉम्प्युटरच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
हे अभियान सलग पाच दिवस चालणार असून, परिसरातील नागरिक आणि नव मतदारांनी यात सहभागी होऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमामुळे नवमतदारांना आपल्या लोकशाही हक्काची जाणीव होईल आणि अधिकाधिक नागरिक मतदार यादीत नाव नोंदवण्यास प्रोत्साहित होतील, असे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेत्या शुभांगी ताई पाटील, ज्योतीताई चौधरी, जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, विवेक सूर्यवंशी, ज्येष्ठ शिवसैनिक बाबुभाई पटेल, मिलिंदभाऊ मुंदडा, आबाभाऊ भडागे, संदीप सूर्यवंशी, मनोज शिंदे, संदीप चौधरी, बाळूभाऊ शेंडगे, कपिल लिंगायत, मनोज बंब, गौरव पाटील, सागर साळवे, हर्षल वाणी, गौरव बेंद्रे, विकी चौधरी, प्रवीण चौधरी, सानू बेंद्रे, मोनू मिस्त्री, वृषभ रणमळे, अनिकेत चौधरी यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील नागरिक आणि नवमतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Social Plugin