पद्मश्री कै .डॉ दादासाहेब घोगरे विचार मंचच्या शिष्टमंडळाचे धरणे आंदोलन.

 






शहरातील शैक्षणिक चौकातील पद्मश्री दादासो.घोगरे स्मारक हा फलक तोडण्यात आला असून तो त्या जागी स्मारक फलक पुन्हा लावावे या मागणीसाठी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कै.डॉ. पद्मश्री दादासाहेब घोगरे विचार मंचच्या शिष्टमंडळाने या संदर्भात आयुक्त यांना लेखी निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणारे डॉ. पद्मश्री दादासो, घोगरे हे दलित, पिडित, शोषित चळवळीचे पुरस्कर्ते होते.त्यांनी जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारले, सामाजिक रुढीबाबत जागृती केली . आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती केली. यामुळेच डॉ.घोगरे यांना केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला. शहरातील कमलाबाई शाळेजवळील  चौकाचे महानगरपालिके मार्फत दादासो पद्मश्री डॉ.घोगरे शैक्षणिक चौक असे नामकरण करण्यात आले आहे.यामुळे चौकात रीतसर स्मारक फलक लावण्यात आला होता. दरम्यान ,आमदार डॉ.फारुख शाह यांनी शाळेतील मुलींना येण्या- जाण्यासाठी ओव्हर ब्रीजचे काम केले.त्यावेळी  संबंधित ठेकेदाराने चौकातील दादासो पद्मश्री डॉ घोगर सदर फलक तोडण्यात आला आहे. यामुळे संबंधित ठेकेदाराची पंच मंडळाच्या सदस्यांनी भेट घेवून या ठिकाणी नवीन फलक लावण्यासंदर्भात विनंती केली होती.यावेळी माजी आमदार फारुख शाह यांनाही नवीन स्मारक फलक करून देण्यासाठी  विनंती करण्यात आली होती.यावेळी अध्यक्ष राजू इंगळे, उपाध्यक्ष सुनील देवरे, अँड. चंद्रकांत जावळे, कार्याध्यक्ष  कमलाकर पाटील, सरचिटणीस नैनेश साळुंखे व अशोक सुडके , शरद बिरारी, आनंदराव चौधरी, संतोष खंडेलवाल, रियाज पठाण, श्रीमती संगीता चौधरी, विलास गायकवाड, शिवाजीराव काकडे, राजु जाधव, कैलास मराठे,वामन मोहिते, गोकुळ साळुंखे,प्रकाश पाटील, संतोष मोरे, कचरु कापसे,सुधीर मगर ,वसंत वाघ,सीमाताई पाटील, उर्मिला पाटील, जिजाबाई मासुळे,ललिता ताई पाटील, घनश्याम जोशी,नंदू ठोबरे,विलास पाटील , सुनिल ठाणगे,आदी यावेळी उपस्थित होते .