महसूल अधिकाऱ्यांवर झालेला भ्याड हल्ला व निसाणेचे पत्रकारांवर वाळू माफियांकडून झालेल्या मारहाणीच्या विरोधात दलित समाजाकडून शहरात आक्रोश मोर्चा.

 




तहसीलदार कार्यालय येथे महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ला व निसाणे गावात दलित समाजातील पत्रकारांवर वाळू माफियांकडून झालेल्या मारहाणीच्या विरोधात दलित समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सामान्य नागरिकांवर व कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अवैध धंदे करणाऱ्यामार्फत मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत.बीड येथील मस्साजोग असो किंवा शिंदखेडा तालुक्यातील निसाने येथील वाळू माफियांकडून पत्रकारावर होणारा हल्ला असो, तसेच शहरातील ग्रामीण तहसीलदार कार्यालयात बेकायदेशीरित्या घुसून कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी यांच्यावर गुटखा माफीया यांच्या टोळीकडून होणारा भ्याड हल्ला असो ,असे अनेक  प्रकरणात स्थानिक राजकारणांच्या व पुढाऱ्यांच्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे अनेक सामान्य नागरिक , कर्मचारी ,पत्रकार हे न्यायापासून वंचित असतात. गेल्या काही दिवसापासून सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव हे जनतेची प्रामाणिकरित्या सेवा करीत गुंड विक्की परदेशी या गावगुंडांने व त्यांच्या सहकाऱ्यांसह अधिकारी पाईकराव यांचेवर  राजकीय दबाव आणून बेकायदेशीर प्रकरण मंजूर करून घेण्याचा हट्ट व आग्रह धरला. व अशावेळी कर्तव्यदक्ष अधिकारी पाईकराव यांनी स्पष्टपणे नकार दिल्याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. संबंधित पाईकराव यांच्या डाव्या डोळ्यावर जबर दुखापत  झाली आहे. शहरात राजकीय प्रभाव खूप मोठा असून मी तुझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून तुला निलंबित करेल जीवे ठार मारेल अशी धमकी दिली. तुम्ही माझे काहीही वाकडे करून घेणार असे सांगितले. त्यानंतर त्या कार्यालयातील सर्वासमक्ष पाईकराव यांना मारहाण करत त्या कार्यालयातील शासकीय वस्तूची तोडफोड करून सदर कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारींवर भीतीचे वातावरण पसरविले आहे. सदर गुंड विक्की परदेशी व अमोल सूर्यवंशी यांना तिथेच न थांबत तहसीलदार यांच्या निजी कशात जाऊन अरेरावी केली . धिंगाणा घातला त्यानंतर पाईकराव व तहसीलदार अरुण शेवाळे सतो  यांच्या समक्ष शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेकामी गेले असता गुंड विक्की परदेशी याने तेथे त्यांचे सहकारी गुंड शेकडो प्रमाणात बोलावून घेतले. व गुन्हा दाखल करण्याच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करून श्री.पाईकराव यांना धमकावले व शिवीगाळ केली सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही दुपारी ३.३० वाजेपर्यंत करण्यात आली.त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापासून ते गुन्हा दाखल झाल्यानंतरही सायं ७ वाजेपर्यंत गुन्ह्यातील गुंड आरोपी विक्की परदेशी हा पोलीस ठाण्याच्या आवारात हजर असतानाही पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी आरोपीस अटक करून घेतली नाही.तसेच शिंदखेडा तालुक्यातील निसाने गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व वाळू तस्करांची वाढती मुजोरी  व गुंडगिरी यांच्या विरुध्द दलित समजाच्या पत्रकार जतन नगराळे हे आवाज उठवत असता तेथील नामांकित गावगुंड राज गिरासे व प्रशांत समाधान पाटील यांनी त्यांच्या ८ ते १० सहकाऱ्यांसह लाठी काठी घेऊन व शस्त्र घेऊन त्यांच्या घरावर हल्ला केला. व जतन नगराळे यांना जबर मारहाण केली.त्यात त्यांना डोक्याला व हाताला जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. व जतन नगराळे आणि त्यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.या प्रकरणात शिंदखेडा पो. स्टे .येथे राज गिरासे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोघे घटनेतील आरोपींना अटक करून संबंधित अधिकारी यांची चौकशी करावी .अशी मोर्चातून मागणी केली आहे.यावेळी हजारोंच्या संख्येने दलित समाज उपस्थित होते.