शहरातील चितोड रोडवरील खंडेराव महाराज यांची सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्सहात यात्राउत्सव साजरा करत असतात. यावर्षी देखील यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करत असतात.यात भंडारा, पालखी मिरवणूक, अहिराणी गाणे,पोवाडा यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. काल २६ जानेवारी रोजी महाआरती व भंडाराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी खंडेराव महाराज यांचे परिसरातील नागरिकांनी दर्शन घेतले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विकास बाबर, श्रीरंग जाधव, किशोर सरग, सुभाष खताळ, निलेश नेमाने, एडवोकेट विशाल साळवे,संतोष जाधव, रामदास महानोर ,बापू बाविस्कर , दिलीप शिंदे, राजू महानोर , दत्तू थोरात , मनोहर वाघ, प्रकाश भदाणे, शशिकांत सरदार, हे उपस्थित होते. आज रात्री ८ वाजता खान्देशी कलावंतांचा लाईव्ह कार्यक्रम होणार असून , ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता सचिन कुमावत, अभिनेत्री कावेरी पाटील , संगीतकार समीर शेख, गायक भैय्या मोरे, गायक मेघा मासुळे,हे उपस्थित असणार आहे.उद्या पोवाडा किंग शाहीर रामानंद उगले यांचा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित पोवाडा सादर केला जाणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन समिती अध्यक्ष गौतम पगारे यांनी केले आहे. याप्रसंगी गंगाराम गवळी, बापू गवळी सिद्धाआप्पा गवळी, योगेंद्र बोरसे, धर्मा गवळी, लोकेश गवळी,अमर नवने, बापू मराठे, राजेंद्र दराडे, बंडू सरगे, गणेश नेमाने,सागर शिंदे आदीसह उपस्थित होते.


Social Plugin