जुने रेकॉर्ड गहाळ केल्याचा संशय , प्लॉट खरेदी - विक्रीतून फसवणूक - भाजयुमोचे शहराध्यक्ष आकाश परदेशी.

 



धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या भूखंडाच्या नोंदणी दप्तरात अनागोंदी करीत जाणूनबुजून सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी गहाळ केले   असल्याचा संशय व्यक्त करीत भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांनी प्रशासनाकडे गंभीर तक्रार केली आहे.तसेच याविरुद्ध आंदोलन करीत लक्ष वेधले आहे.या बाबत त्यांनी जिल्हाप्रशासनाला निवेदन दिले.



निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पारोळा रोड लगत असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती लागून असलेली भूमापन क्र.३३७ पैकी क्षेत्र ० हे ६९ आर ही जागा माझे आजोबा छबुसिंग गणपतसिंग परदेशी , आत्या पुष्‍पाबाई विजयसिंग परदेशी यांच्या मालकीची होती.या भूखंडावर जामोद जिनिंग/ दत्ता फॅक्टरी यांनी प्लॉट पाडलेले आहेत.या भूखंडबाबत  सरकारी दप्तरात फेरफार नोंद क्र १३९९३ आणि फेरफार नोंद क्र .१६७८२ नुसार जामोद जिनिंग यांना विक्री केला आहे . असे रेकॉर्ड दिसत आहे. परंतु याबाबत जुने रेकॉर्ड शोधले असता जाणूनबुजून सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी गहाळ केले असल्याचा संशय आहे. याबाबत तलाठी कार्यालय, रेकॉर्ड शाखा, खरेदी विक्री विभाग आणि नगर भूमापन कार्यालयात येथे माहिती मिळण्याबाबत अर्ज केलेला आहे.माझ्या वृद्ध आजोबा,आजी आणि आत्या यांनी हा भूखंड कधीही विक्री केलेला नाही. याबाबत सरकारी दप्तरात खरेदी विक्रीच्या नोंदी मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. आज रोजी ज्या कंपनीच्या ताब्यात ही जमीन आहे . त्यांच्याकडे जर या मिळकतीबाबत खरेदी विक्रीचे  कागदपत्र अथवा मालक असल्याचे पुरावे असतील  तर  माझ्या कुटुंबाला द्यावेत जेणेकरून मला कुटुंबाचे समाधान करता येईल .माझ्या कुटुंबाची आज रोजी ० हे ६९ आर इतकी जागा शिल्लक आहे .नगर भूमापन कार्यालयात धुळे शहर फायनल प्लॉट  क्र.२६ हा एक दिवसात कोरोना काळात सरकारी कार्यालय बंद असताना कुणाच्या अर्जांने कामकाज झालेले आहे. माझे आजोबा हे सन २००५ मध्ये मयत झालेले आहेत. आणि मिळकतपत्रिका  २०२० मध्ये उघण्यात येते,हा प्रकार धक्कादायक आहे त्यामुळे धुळेकर जनतेची  प्लॉट  खरेदी विक्रीतून मालकी हक्काबाबत फसवणूक होवू शकते .धुळे शहर   येथील भूखंड क्र ३३७ फेरफार नोंद क्र १३९९३ आणि १६७८२ या फेरफार नोंदी अथवा खरेदी विक्रीबाबत कागदपत्र असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा , असे आवाहन ही आकाश परदेशी यांनी केले आहे.यावेळी आकाश परदेशी , सागर परदेशी ,रितेश परदेशी,जयेश परदेशी , शुभम परदेशी ,सचिन पाटील,पंकज धात्रक,दादा कोळी ,विनय बेहरे आदी उपस्थित होते.