भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त शहरातील मालेगाव रोडवरील विश्वकर्मा चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष अॆ.बी वाघ, उपाध्यक्ष भटू बागुल, माजी महापौर के. डी मिस्तरी, कार्याध्यक्ष छगन वाडेकर, सेक्रेटरी दिगंबर वाडेकर, सह सेक्रेटरी अशोक वाघ, खजिनदार विजय शेलार , बांधकाम समितीचे चेअरमन दीपक शेलार , तंटामुक्ती समितीचे चेअरमन राजेंद्र मोरे, शिक्षण समितीचे चेअरमन सुभाष वाडेकर, तांत्रिक सल्लागार स्वप्निल बागुल, माजी नगरसेवक दिनेश शार्दुल, किरण वाघ, किशोर शेलार, किरण शेलार, विजय वाघ, अतुल बागुल, दीपक बागुल व महिला पदाधिकारी,युवक पदाधिकारी,जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Social Plugin