अखिल कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने वधु वर पालक परिचय मेळावा संपन्न झाला. शहरातील सैनिक भवन येथे पार पडला.या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करून वधूवर पालक परिचय पुस्तिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आला.
यावेळी अखिल कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय मंडळ अध्यक्ष कमलाकर पाटील, उपाध्यक्ष मनोहर पाटील, सचिव विलास पाटील, सहसचिव शरद बिरारी, रमेश पाटील, गोरख पाटील, सुबोध पाटील , ज्ञानेश्वर पाटील, बगदे नाना, शशिकांत पाटील आदीसह उपस्थित होते.
या वधु-वर परिचय मेळाव्यात ३०० परिचय पत्र आलेले होते.त्यापैकी ३५ परिचय पत्र मुलींचे आहे.तर उर्वरित परिचय पत्र मुलांचे आहे. या मेळाव्यात घटस्फोटीत वर वधू यांनाही प्राधान्य देण्यात आले.


Social Plugin