शिवजयंतीनिमित्ताने शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर.

 


देवपुरातील स्टेडियम चौकातील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. सालाबादप्रमाणे यावर्षीही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते . यावर्षीही मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणावर तरुणांनी सहभाग नोंदविला होता.सुमारे ८०ते १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी उत्सव समितीचे प्रमुख मयूर देवरे ,आबा पाटील,मुकेश खरात, अरुण धुमाळ, जगदीश चव्हाण, किशोर माळी, मनोज बैसाणे, आकाश पाटील, भटू पाटील, राकेश पाटील, अनिल चित्ते, धनंजय पाटील, विक्की देवरे, निलेश सपकाळ, विक्की खरात , दीपक देसले, गोलू पानपाटील, ऋषिकेश पाटील, जितू चव्हाण, सचिन पाटील, दीपक चौधरी, भटू साळवे, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.