दरवर्षीप्रमाणे यंदाही देवपूर भागात असलेल्या सिद्धार्थ नवयुवक मित्र मंडळ देवपूर धुळे परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सिद्धार्थ कॉलनी परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तरुण युवकांनी एकत्र येत मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुण मोठ्या संख्येने या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्ताने सिद्धार्थ नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, एडवोकेट विशाल साळवे सिद्धार्थ मित्र मंडळ ज्येष्ठ पदाधिकारी किसन आप्पा मोरे, सुशील जैन, पंकज नेतकर, विवेक नेतकर, सिद्धार्थ वाघ, सोनू बोरसे, यांच्यासह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने यंदा तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीची सुरुवात सिद्धार्थ नवयुवक मित्र मंडळ पासून करण्यात आली होती. तसेच ही मोटरसायकल रॅली जैन सिनियर कॉलेज स्टेडियम चौक दत्त मंदिर या परिसरात होत हिचा समारोप पुन्हा सिद्धार्थ निमित्त मंडळ या ठिकाणी करण्यात आला या रॅलीचे आयोजन मंडळाचे कार्यकर्ते विशाल मोरे, प्रीतम रामोशी, प्रफुल सोनवणे,चंद्रकांत महाले, राज सोनवणे, राज ठाकूर, मेघनिल हिरे, दीपक बोरसे, दुर्गेश पगारे, गणेश बर्वे, अंकित पगारे, प्रेम शिंदे, तेजस भोई आदी कार्यकर्ते यांनी यावेळी परिश्रम घेतले...

Social Plugin