शहरातील पद्मालय शासकीय विश्राम गृह येथे रविवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर जळगाव शहर उत्सव समितीची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंती सोहळा 2025 मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी चर्चा करण्यात करण्यात येऊन उत्सव समितीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी आशिष सपकाळे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्ष म्हणून मोनू अडकमोल व सौ भारतीताई रंधे, कार्याध्यक्ष मोरे आबा यांची देखील निवड करण्यात आली, बैठकीच्या वेळेस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे माजी अध्यक्ष सतीश गायकवाड व राधे शिरसाठ , विशाल अहिरे हरिश्चंद्र सोनवणे, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, माजी नगरसेवक राजू मोरे, अजय गरुड, अनिल अडकमोल समाजसेवक मुकुंद सपकाळे, विजय सुरवाडे, आरपीआयचे शहराध्यक्ष मिलिंद सपकाळे, सचिन सरकटे, सागर बांगर, टीना तायडे, समाधान सोनवणे, जितेंद्र केदारे, सुमित अहिरे, अॅड. अभिजीत रंधे तसेच समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Social Plugin