पोलिस दल व खिदमत फाउंडेशनांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर संपन्न.






शहरातील ८० फुटी रोडवरील भोला बाजार येथील ए. आय. टी प्रायमरी अँग्लो उर्दू हायस्कूल आवारात जिल्हा पोलिस दल व खिदमत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२५ च्या अनुषंगाने पोलीस भरती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी सहभाग नोंदविला होता.या पोलिस भरती प्रकिया किती महत्वाची असते. आणि कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेत तयारी करण्यात येते.या संदर्भात पोलीस विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे,माजी उपमहापौर हाजी शव्वाल अन्सारी ,माजी नगरसेवक अब्दुल लतीफ ,युसुफ मुल्ला, अमीन पटेल, मुख्तार मन्सुरी , वसीम बारी, वसीम खान, शब्बीर मन्सुरी , सादिक शेख,हाजी रौशन सत्तार ,सलीम टंकी, परवेज शेख,खान अबूलआस शेख,हफिज शेख ,आदीसह पोलिस कर्मचारी व फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.