धुळे शहरातील विद्यावर्धिनी सभेचे डॉ. एम. वाय. वैद्य कला, प्रा. पी. डी. दलाल वाणिज्य आणि डॉ. डी. एस. शाह विज्ञान महाविद्यालयात
वार्षिक पारितोषिक समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कबचौ उमवीचे प्रकूलगुरु प्रा. एस. टी. इंगळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्यातील कमकुवत दिव्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून ते दूर करीत आत्मविकास घडवावा असे प्रतिपादन यांनी केले
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष शरद पाटील, सेक्रेटरी व खजिनदार युवराज करनकाळ, संस्थेचे सदस्य पितांबर महाले, जगदीश गायकवाड, प्रा. अनिल दामोदर, विश्वस्त अँड. जे. टी. देसले, सेवानिवृत्त प्राचार्य बाबा हातेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश पाटील, उपप्राचार्य डॉ. योगेश पाटील, डॉ. राजवीरेंद्रसिंग गावित, पंजाबराव व्यास, राहुल वाघ व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही प्रतिकूलता येते. पण या प्रतिकूलतेला कधीच यशाच्या मार्गातील अडथळा बनू देऊ नका, असे आवाहन अतिरिक्त अधीक्षक किशोर काळे यांनी विद्यार्थ्यांना केले. आजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच नवीन आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे, असा सल्लाही त्यांनी याप्रसंगी दिला.
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या पारितोषिक वितरण समारंभात बेस्ट कॅडेट - अंडर ऑफिसर चंद्रशेखर बर्गे बेस्ट फायरर - ज्यु. अंडर ऑफिसर सागर सोनवणे, पुरुष अष्टपैलू खेळाडू शैलेश पावरा महिला अष्टपैलू खेळाडू लता वसावे, विद्यापीठ सुवर्णपदक विजेत्या हर्षदा पाटील, खुशी अग्रवाल मीनाक्षी ईशी, दिव्यांग कलावंत पवन मराठे, धनंजय पाटील, राज्यस्तरीय जुडो स्पर्धेतील विजेता आदित्य गोसावी, सेट परीक्षा उत्तीर्ण शुभांगी देशमुख व तेजस कुलकर्णी आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या गुरुप्रसाद चव्हाण यांच्यासह शेकडो शैक्षणिक कला, क्रीडा आणि विविध स्पर्धा मधील विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सूत्रसंचालन व यादी वाचन डॉ सतीश निकम, संतोष खत्री, विजय पालवे, निलेश रोटे, वैशाली पाटील, उज्वला वाणी व शुभांगी देशमुख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत लगडे, प्रशांत काळे, डॉ. आशा काटे, अंकुश गायकवाड, शालिग्राम गर्दे, अक्षय जोशी व अशोक मुजगे आदींनी परिश्रम घेतले.


Social Plugin