माता रमाई जयंतीनिमित्त संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान व श्रावस्ती महिला संस्थेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर.






त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान व श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोग निदान   व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अस्थिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, व नवजात शिशु, स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र तज्ञ व वंध्यत्व चिकित्सक, हृदय रोग, मधुमेह तज्ञ, एन्डोस्कोपी व लॅपरोस्कोपिक  सर्जन ,सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, संचालिका निर्णय डायग्रोस्टिक , नेत्ररोग तज्ञ, जनरल फिजिशियन,लहान मुलांचे, स्त्रियांचे,पोटाचे, हाडांचे,  डोळ्यांचे, मधुमेह , हृदयरोग मोफत तपासणी व योग्य मार्गदर्शन, निर्णय डायग्रोस्टिक, लॅबच्या माध्यमातून आवश्यक रक्त , लघवीच्या चाचण्या इतर आरोग्यावर तपासणी करण्यात आली आहे.या शिबिरात सर्व डॉक्टर, संघशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान व श्रावस्ती महिला सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.