सध्याचे युग सोशल मीडिया, आर्टिफिशल इंटेलिजन्सचे असून यांच्या आहारी जावून आपले आई वडील , तारुण्य वाया घालवू नका, बाप कष्ट करून तुम्हाला शिकवता आहेत. त्यांच्या कष्टाची बापाच्या घामाची किंमत जाणा , शिका, मोठे व्हा, स्वताच्या पायावर उभे राहून आई- बापाला मान उंच करायची संधी द्या.आता सुधारलात तर ठीक नाही तर रडायला ही दिवस कमी पडतील.असा सणसणीत डोळे उघडणारा उपदेश प्रसिद्ध समाज प्रबोधनकार व्याख्याते प्रा.डॉ.वसंत हंकारे यांनी युवा पिढीला दिला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वंदे मातरम प्रतिष्ठान आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज १० वाजता छत्रपती महाराज अग्रसेन हॉल येथे व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल व्याख्याते प्रा.वसंत हंकारे ,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे , उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे , शिक्षणाधिकारी मनिष पवार, ज्येष्ठ पत्रकार महेशबाबा घुगे,देविदास बोरसे,या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी धुळे शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने व्याख्यानाला उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित बोरसे, दीपक काकुस्ते, शामकांत बोरसे, निलेश राजपूत, जितेंद्र सोनवणे,संकेत बोरसे,प्रदीप पाटील आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.


Social Plugin