छ्त्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित साई मोरया गृप आयोजित रक्तदान शिबीरास शिवप्रेमींचा उत्स्फुर्त प्रतीसाद : ६८ शिवप्रेमींनी केले रक्तदान.

 





खोटेनगर येथील साई मोरया गृप तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते  रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  खासदार स्मिताताई वाघ , आमदार राजूमामा भोळे, शिवसेना संपर्कप्रमुख निलेश पाटील, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, गणेश गायकवाड, माजी नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, मनोज चौधरी, प्रतिभा पाटील, महाराष्ट्र साई सेवा परिवाराचे सचिव राजेश जाधव, क्रीडाशिक्षक महासंघाचे निलेश पाटील, सचिन महाजन, डीपीएल चे अविनाश देवरे, प्रविण आढाव, प्रविण भालेराव, राजेंद्र सोनवणे, शंकर निंबाळकर, प्रमोद चौधरी, राहुल पाटील यांची उपस्थिती होती मान्यवरांनी श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण केले आले शिबीरात ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व प्रथम फारुख सैयद यांनी रक्तदान केले तसेच भारतीय सैन्य दलातील राष्ट्रीय खेळाडू मयूर वाघमारे यांनी देखील रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास साई मोरया ग्रुप तर्फे टी-शर्ट भेट देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साई मोरया ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत जाधव, सिद्धांत कदम, हितेश पाटील, प्रसन्न जाधव, हेमंत महाजन , हर्षल पाटील, धीरज पाटील, निखिल पाटील, गणेश कुमावत, अनिल नाईक, मंथन ईशी, विवेक करपे, सौरभ कदम, निखिल जाधव, सुदर्शन ईशी, सुर्यकांत भामरे, राज कोळी, मोनू पाटील,चेतन कोळी, प्रतीक सोनवणे, वेदांत ईशी, देवेन ईशी, सिद्धेश पाटील, देवेश कोळी , अनुराग सोनवणे, मनीष ईशी आदींनी परिश्रम घेतले.