बिहारमधील बुध्दगया येथे महाबोधी बुध्दविहार हे बौध्द धर्मीयांचे प्राचिन धार्मिक स्थळ आहे.मात्र , हिंदू धर्मातील उच्च वर्णीयांनी त्यावर सुरुवातीपासून कब्जा केलेला आहे.तरी त्यांच्या ताब्यातून सदर धार्मिकस्थळाची मुक्तता करून बौध्द भिक्खू संघाकडे सुपूर्द करावे, अशी मागणी करत आज संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली . यासंदर्भात जिल्हाप्रशासनामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात भारतातील विविध धर्माच्या चालीरीतीनुसार पूजा, अर्चा, उपासना,प्रचार,प्रसार करण्याचा अधिकार कलम २५,२६,२७ मध्ये नमूद केला आहे. त्यानुसार प्रत्येक धर्मात त्या- त्या धर्मातील पुजारी असतात. जसे की , हिंदू मंदिरांमध्ये हिंदू पुजारी , मुस्लिमांच्या मशिदीत मौलाना मुस्लिम, ख्रिश्चन धर्मात ख्रिश्चन फादर असतात. संविधानातील धर्म हक्क कलम परिच्छेद २६ नुसार प्रत्येक धार्मिक स्थळांची पूजा, अर्चा, व्यवस्था, मालमत्ता , प्रशासन इ.अधिकारी हे त्याच धर्मातील लोकांना असतो. परंतु भारतात १३०० वर्ष प्राचीन सम्राट अशोक कालीन महाबोधी बुध्दविहार ( बुध्दगया ,बिहार) हे हिंदू धर्मातील पुजारांच्या ताब्यात आहे . वास्तविक, धार्मिक स्थळ बौध्द धर्मियांचे आहे. असे असताना हिंदू पुजाऱ्यांनी त्यावर कब्जा करून संविधानाच्या अनुच्छेद कलम २६ चे उल्लंघन केले आहे. तरी महाबोधी बुध्दविहार त्यांच्या ताब्यातून मुक्त करून ते बौध्द भिक्खू संघाकडे सुपूर्द करावे,अशी मागणी निवेदनातून केली आहे. तसेच महाबोधी बुध्दविहार मुक्ती आंदोलनाचे आम्ही समर्थन करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी प्राचार्य बाबा हातेकर , दीपकुमार साळवे, हेमंत मदाने, श्रीकृष्ण बेडसे ,रामकृष्णहरी , प्रभाकर खंडारे, रत्नशिल सोनवणे, सुभाष जाधव, काशिनाथ शिंदे, भगवान वाघ, प्रा. विलास चव्हाण,प्रा. डॉ.मोहन मोरे, हर्षबोध मोरे,अनिल दामोदर, हर्षवर्धन आखाडे, साहेबराव पवार, राजेंद्र ढोडरे , बौध्दाचार्य अशोक शिरसाठ ,आर. जे.सोनवणे, बी.जे.अहिरे, पी. टी.बेडसे, मनोहर मोहिते, रवींद्र ढिवरे,विजय भामरे, आनंद भगत, के. एम . शेजवळ, सदाशिव, बापू बाविस्कर, बबन वानखेड, जी. डी.जाधव , छोटूलाल मोरे, धनंजय गाळणकर, रामकृष्ण शिंदे, पुंजू अहिरे, मनोज बैसाणे, सोपान देसले,किरण गायकवाड, अनिल बैसाणे, मोहन सूर्यवंशी, साहेबराव मोरे, सुनिल कासारे, पोपटराव चौधरी , जमिल मन्सुरी, डॉ.दीपक सोनवणे , यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Social Plugin