शहरात तापमान वाढत आहे.अशा स्थितीत सर्वसामान्यांसाठी थंडगार जारचे पाणपोईचा उपक्रम ब्राह्मण समाजाकडून राबविला जातो. समाजाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. चौकाच्या सुशोभिकरणासाठी आपण सर्व प्रकार सहकार्य आपण करू असेही आश्वासन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवाजी रोडवरील कालिका माता देवी मंदिरासमोरील श्री भगवान परशुराम चौकात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते जार पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ,माजी महापौर प्रतिभा चौधरी ,नारायण बुवा समाधी मंदिराचे मठाधिपती दीपक रुद्र महाराज ,विजय पाच्छापूरकर , कैलास शिंदे, प्रसाद जोशी, व्हि. एन . भादलीकर, शिवप्रसाद शर्मा, दुर्गाचरण शर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते. चौकात गेल्या चार वर्षापासून उन्हाळ्याचे चार महिने थंडगार जारचे पाणी ब्राह्मण समाजातील देणगीदारांकडून उपलब्ध करून दिले. त्याचा शुभारंभ काल आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी आयोजनासाठी श्री भगवान परशुराम चौक समितीचे अनिल दीक्षित ,रमेश कुलकर्णी ,भूषण जोशी, शेखर कुलकर्णी, जयेश वावदे, पी. एन.कुलकर्णी , आदींकडून परिश्रम घेतले.या प्रसंगी प्रदीप जोशी, दत्ता कुलकर्णी, रविंद्र टाकणे, नलिनी कुलकर्णी,रेखा कुलकर्णी,प्रमोद कुलकर्णी , पी.आर.जोशी, दीक्षित, वैद्य यांच्यासह समाजबांधव पुरोहित उपस्थित होते. सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले.या उपक्रमासाठी समाजातील अनेकांचे सहकार्य लाभले आहे.



Social Plugin