संस्थेची चौकशी करीत कायदेशीर कारवाई करा, अन्यथा आमरण उपोषण : भगवानसिंग जमादार

 





प्राथमिक आश्रम शाळेत १९९९ पासून स्वयंपाकी पदावर कार्यरत आहे. परंतु संस्थेने माहे फेब्रुवारी  २०२४ पासून बळजबरीने निवृती घेण्यास भाग पाडले . व माझे माहे मे २०२४ ते आज अखेर पर्यंत वेतन बंद असून मी व माझ्या कुटुंबावर फार मोठे आर्थिक संकट कोसळले असून उपासमारीची वेळ आलेली आहे .मला संस्थेत पुन्हा रुजू करून घ्यावे . तस न झाल्यास तर आमरण उपोषणाला बसणार अशी माहिती  संस्थेतील  कर्मचारी  भगवानसिंग अजबसिंग जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली .शिरपूर तालुक्यातील अजनाड येथील वि. जा. भ. ज  प्राथमिक आश्रम शाळेत मी १९९९ पासून स्वयंपाकी पदावर कार्यरत आहे. मात्र संस्थेने फेब्रुवारी २०२४ पासून बळजबरीने निवृती घेण्यास भाग पाडले असून अखेर पर्यंत वेतन बंद केला आहे.पुन्हा संस्थाकडे दि.दहा एप्रिल २०२४ रोजी विनंती अर्ज सादर केलेला असून मला पुन्हा रुजू करून घ्यावे . व संस्थेने मला दि.एक डिसेंबर रोजी रुजू केले. परंतु  सुनावणीचे संदर्भात देऊन माझाकडून दि  .पाच डिसेंबर  रोजी  राजीनामा द्यावा असे सांगितले .मी संस्थेतील  चेअरमन व संचालक मंडळ यांना  विचारणा केली असता की , माझी काय चूक झाली की , माझा राजीनामा घ्यावा लागत आहे .संस्थाचालकांनी त्यांचे उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तर देवून त्यांचा राजीनामा घेतला.आजपर्यंत त्यांचे वेतनही  बंद केले आहे . व संस्थेपासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय करीत आहे.या सर्व गोष्टी पासून मी व माझ्या कुटुंबावर फार मोठे आर्थिक संकट कोसळून उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी जिल्हाधिकारी तसेच प्राथमिक शिक्षण विभाग व सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे. तात्काळ संस्थेची चौकशी होऊन  कायदेशीर कारवाई करण्यात यावी .अन्यथा आमरण उपोषण करेल .असा इशारा आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला.