बौध्दगयाच्या महाविहाराचे नियंत्रण ,व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात द्या, धुळ्यात धरणे आंदोलन.

 








बौध्दगया येथील महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात देण्याबाबत कायद्यात बदल करावा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने आज धुळ्यात धरणे आंदोलन केले आहे.त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,बिहार बुध्दगया येथील महाबोधी बुध्दविहार हे गेल्या ७० वर्षांपासून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. या ठिकाणी ब्राह्मण पंडित ही त्यांच्या पद्धतीने पूजा अर्चा करत असतात.त्या ठिकाणी कर्मकांड करत असतात.जे बुद्धाला अपेक्षित नाही.असे कर्मकांड त्या ठिकाणी करत असतात .१९४९ ला बनवलेल्या कायद्यानुसार या ठिकाणी पाच ब्राह्मण  व चार बौध्द लोकांची कमिटी बनविण्यात आली आहे.या ठिकाणी पाच ब्राह्मण  असल्याने त्यांचेच वर्चस्व  असते.खर्याअर्थाने बघितल्यास १९५० ला भारत हा सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित झाले. १९५० च्या अगोदरचे सगळे झालेले नियम कायदे मोडीत काढण्यात आलेले असतानादेखील बुद्धगयातील बुद्धविहारास १९४९ चा कायदा लागू करण्यात आला आहे.हा कायदा रद्द करून बुद्धगयातील महाबुद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे .या मागणीसाठी आज बहुजन आघाडी व भारतीय बौध्द महासभा धुळे जिल्हा यांच्या वतीने महाधरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम ,भारतीय बौध्द महासभेचे  जिल्हाध्यक्ष देविदास जगताप,महेंद्र महाले,बी. टी अहिरे, तसेच  जितेंद्र शिरसाठ , रविकांत वाघ, शंकर खरात,जिल्हा संघटक आकाश बागुल, योगेश पगारे, सागर चव्हाण,विशाल महाले , आकाश येलेकर, चंद्रमणी वाघ,  सीताराम  वाघ,दिलीप बोरसे ,राहुल पाटोळे,मोहन वाघ, आदी सहभागी झाले होते.