एसटी महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बस स्थानकात आंदोलन.

 





एसटी महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बस स्थानक येथे महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यात १ एप्रिल २०२० पासून देण्यात आलेल्या पगारवाढीचा १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या फरकाची थकबाकी त्वरित देण्यात यावी, राज्य शासनाप्रमाणे महागाई भत्ता फरकासह ५३% दराने देण्यात यावा, रु १च्या पटीत करण्यात आलेली भाडेवाढ ही प्रवासी तसेच वाहकांसाठी डोकेदुखी ठरली असून ती पाचच्या पटीत करण्यात यावी, पी.एफ उचल सुमारे सहा महिन्यांपासून प्रलंबीत असून ती त्वरित मिळावी , जुल्मी शिस्त आवेदन पद्धत रद्द करण्यात यावी , सन २०१६ ते २०२०चा घरभाडे भत्ता १% कमी दराने दिला होता .तो ३% दराने देवून थकबाकीसह देण्यात यावे ,यासह कामगारांच्या इतर प्रलंबीत मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी  अध्यक्ष दीपक पांडव,सचिव संतोष वाडीले, खजिनदार डी. आय. राजपूत, संजय परदेशी, आर के महाजन,जे. डी.पाटील, आर . एस. बाविस्कर, एस. पी बागले ,महेंद्र सनेर , जी. व्ही पाटील,प्रमिला दीक्षित,नीलिमा नेतकर , स्वप्ना चौधरी, कोमल ठाकूर, गोपाल ठाकरे , आर. एन .पाटील , विनोद पवार,नामदेव पाटील, जितेंद्र कल्याणकर,गोरख भोई, आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.