संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन.

 








प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने तीन दिवसीय  धरणे आंदोलनाला सुरुवात केली. तत्पूर्वी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने अंतर्गत  सफाई कामगारांना घरे बांधून द्यावीत, सफाई कामगारांच्या वारसास ३० दिवसात नियुक्ती  द्यावी ,सफाई कामगारांच्या मुला  मुलींनी मानधन तत्वावर नोकरी द्यावी आणि सेवानिवृत्त , सफाई कामगारांना वाढीव उपदानाची सातव्या वेतन आयोगाची रक्कम त्वरित अदा करावी आणि महानगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या ॲडव्हॉन्स मध्ये वाढ करावी ,सफाई कामगारांना त्यांच्या सुरक्षेसाठी साडी ,गणवेश ,स्वेटर, मफलर, चप्पल, बुट , गमबुट , पाट्या , झाडू , गटरपावडी,आदी साहित्य त्वरित द्यावेत.अशा मागण्या आहेत निवेदनावर बापूराव खरात, मुनाफ शेख कादर,कुणाल बोरसे,सुनिल चित्ते,प्रा सलीम बेग,राकेश भवरे, दिलीप माळी,मिलिंद शिरसाठ ,चेतन सोनकांबळे , उत्तम साळवे ,प्रकाश गवळी , भानुदास भवरे,विनोद मोहोड , बायजाबाई बैसाणे, नसाबाई अहिरे ,मधुकर शामराव बैसाणे,सुरेश येवले ,  संजय मल्हारी बैसाणे,प्रवीण वाघ, मोहन शिंदे,देविदास पवार,किशोर सोनवणे ,संदीप अशोक मोरे,भानुदास भवरे आदींची नावे आहेत.