खेलो इंडिया राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगाव मुलींचा संघ घोषित व रवाना पुनम सोनवणे कर्णधारपदी

 


अस्मिता हॉकी राज्यस्तरीय लीग  खेलो इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र आयोजित जूनियर मुलींची हॉकी स्पर्धा पुणे येथील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे ९ ते १४ मार्च दरम्यान होत असून त्यासाठी आज जळगाव जिल्हा हॉकी संघाची निवड संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी घोषित केली.








संघाला शुभेच्छा देण्यासाठी हॉकी महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ अनिता कोल्हे, सचिव फारूक शेख , हीमाली बोरोले, वर्षा सोनवणे , इम्तियाज शेख , ॲड आमिर शेख, रेल्वे चे राष्ट्रीय खेळाडू अकील शेख व  आरीफ कुरेशी यांची उपस्थिती होती.


निवड झालेला संघ खालील प्रमाणे


उत्कर्षा पाटील, गायत्री बाविस्कर, दीपिका कोळी,पुर्ती पाटील, स्नेहल कोळी, गायत्री कोष्टी, शितल पाटील, कल्याणी आस्वार, देवयानी सोनवणे (कर्णधार) पुनम सोनवणे  

(ऊपकर्णधार),नम्रता बाविस्कर ,

उज्वला पाटील ( सर्व जळगाव)

 सदफ  नाज, गौरवी पाटील , मैथली चौधरी, प्रांजल ढाके (सर्व भुसावळ) रितिमा बारेला (अमळनेर)

रोहिणी ज्ञानेश्वर कोळी (राखीव)

संघ व्यवस्थापक म्हणून खुशी श्रीवास्तव तर प्रशिक्षक इम्रान बिस्मिल्ला व रोहिणी सुतार यांची निवड करण्यात आली.


.