सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना धरणे आंदोलन.








राज्य सरकारी निमसरकारी  कर्मचारी व शिक्षक शिक्षकतेर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी शहरातील क्युमाईन क्लब समोर भोजन काळदरम्यान धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. पूर्वीचे आणि आताच्या सरकारच्या कारकिर्दीत सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु मागणी पत्रातील एकही मागणीची अद्याप ठोस पूर्तता झाली नाही. यासाठी प्रदीर्घ काळ प्रलंबित असणाऱ्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील सर्व  कर्मचारी धरणे आंदोलनास उतरले आहे. शासनाने लवकर मागणी पूर्ण करावी अशी मागणी देखील यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांनी आज धुळ्यात सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनातून कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारीमार्फत त्यांच्या भावना शासनाकडे पोहचविल्या आहे. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक - शिक्षकेतर  कर्मचारी संघटना समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , राज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षक कर्तव्य बजावत असून जनता जनार्दनाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. मागील सरकारच्या कारकिर्दीत ४ सप्टेंबर २०२४ रोजी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्री अथिती गृहावर चर्चा झाली. पूर्वीच्या आणि आताच्या सरकारच्या कारकिर्दीतील सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील आमच्या मागणीपत्रातील एकाही मागणीची पुर्तता झाली नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. प्रदीर्घ काळ प्रलंबित असणाऱ्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील कर्मचारी आज सत्याग्रह आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनात डॉ संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, सुरेश पाईकराव, राजेंद्र माळी, दीपक पाटील, एस. यु. तायडे, पोपटराव चौधरी, संजय पवार, सुरेश बहाळकर , वाल्मीक चव्हाण, नागेश कंडारे, मोहन कापसे ,चंद्रशेखर पाटील, दिनेश महाले , दीपक महाले, प्रा.उदय तोरवणे ,आर. व्हि .पाटील ,प्रतिभा घोडके ,किशोरी अहिरे, वाय .एन पाटील, दिवानंद ठाकूर, विक्की गवळे, सुधीर पोतदार, बी. एन.बिरारी यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.