राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी ला सुरुवात २० वर्षातील मुलांना सुवर्णसंधी.



राज्यस्तरीय आंतर जिल्हा २० वर्षातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा ११ एप्रिल पासून लोणावळा येथे सुरू होत असून त्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणीला सुरुवात झाली असून आज या निवड चाचणी साठी 53 युवा खेळाडूंचा सहभाग होता. विशेष करून यात जळगाव, भुसावळ, सह रावेर, चोपडा, अमळनेर, पारोळा येथील तरुणांचा सुद्धा समावेश आहे.

 

फुटबॉल तरुणांना संधी

ज्या फुटबॉल खेळाडूंनी अद्याप निवड चाचणीसाठी सीआरएस ची नोंदणी केली नसेल त्यांनी ३ व ४ एप्रिल ला सीआरएस करून निवड चाचणीला ते हजर राहू शकतात.

 अंतिम संघ निवड ८ तारखेला होणार असल्याने जो कोणी खेळाडू काही कारणास्तव १ एप्रिल पर्यंत  नाव नोंदवले नसेल त्यांच्यासाठी संघटनेने एक संधी पुनश्च दिलेली आहे.

तरी कृपया जळगाव जिल्ह्यातील युवा फुटबॉल खेळाडूंनी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सकाळी ८ वाजता उपस्थिती घ्यावी असे आवाहन संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी केलेले आहे.