धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सन २०२५-२०३० या पंचवार्षिक निवडणुकीच्या १३ जागांसाठी १ हजार ३०० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.रविवारी सकाळी ८ वाजेपासून निवडणूक प्रकिया राबविण्यात आली होती. पी. टी भामरे , प्रफुल्लकुमार शिंदे,हेमंत सूर्यवंशी,अभियंता एच. ए. पाटील, डी. ए.पाटील, विरेंद्र साळवे, सचिन गुंडले, या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल स्थापन करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच दोन जागा या बिनविरोध करण्यात आल्या. यात भटक्या विमुक्त जाती/जमाती / विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून रवींद्र भाऊराव आजगे आणि अनुसूचित जाती / जमाती मतदार संघातून गणेश चुनिलाल कोकणी यांचा समावेश आहे.दोन जागा या बिनविरोध झाल्यामुळे १३ जागांसाठी मतदानांची प्रक्रिया राबविण्यात आली होती. सर्वसाधारण मतदार संघाच्या १० जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.त्या विजयी १० जागांमध्ये प्रवीण कुमावत ( ८९२), भरत देसले (८८६), धनराज पाटील (८५८),महेंद्र पाटील (८४९), संजयकुमार पाटील (९०६) , अविनाश बैसाणे (८१९), उज्वल भामरे (८७१) , कल्पेश माळी (८९५), सुशील सोनवणे (८५२), भाग्यश्री सोलंकी(८४२) यांचा विजय झाला आहे. तर पराभूतमध्ये दोन उमेदवार आहेत.त्यात दादासाहेब नगराळे आणि विकास माळी यांचा समावेश आहे.महिला राखीव मतदार संघात दोन जागासाठी तीन महिला निवडणूक रिंगणात होत्या .विजयी झालेल्यांमध्ये गौरी बेहरे (७६८) आणि मनिषा सोनवणे (७६०) या दोघं महिला मतांनी विजयी झाल्या आहेत .तर याच मतदार संघात भारती सोनवणे या पराभूत झाल्या आहेत.इतर मागासप्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते.त्यात विजयी उमेदवारांमध्ये सुधीर भामरे (६३८) यांचा समावेश आहे.तर प्रतिस्पर्धी असलेले वनराज भिमराव पाटील यांचा पराभव झाला .

Social Plugin