कचरा ठेक्याच्या नावाखाली ठेकेदाराच्या संगनमताने करोडोचा भ्रष्टाचार - रणजीत भोसले.


ठेकेदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या  संगतमताने मोठा भ्रष्टाचार पुराव्या सह भ्रष्टाचार दाखवतो. रणजीत राजे भोसले यांनी सांगत    व ठेकेदाराला दंड करून चौकशी   समिती स्थापन करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आले.

या ठिकाणी असे  सांगण्यात आले की धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला आहे, सर्वत्र शहरांमध्ये घाण कचऱ्याचे ढीग दिसून येतात. दिवस १५,१५ व २५ ,२५ दिवस घंटागाडी येत नाही.या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे महापालिकेच्या आयुक्त सौ .अमिता दगडे पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. व पुराव्यानिशी भ्रष्टाचार उघड करण्यात आला धुळे शहरातील कचरा जमा करण्याचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्ट या कंपनीला देण्यात आलेला आहे.सदर कंपनी गेल्या सहा वर्षापासून धुळे शहरांमध्ये कचरा उचलण्याचे काम करीत आहे. परंतु आज धुळे शहरात सर्वत्र कचरा दिसून येतो . ठीकठिकाणी  कचऱ्याचे ढीग आहेत.गटारात घाण दिसून येते.सगळीकडे अस्वच्छता धुळे शहरांमध्ये पसरली आहे.याला सर्वस्वी कचरा ठेकेदार व अधिकारी, कर्मचारी जबाबदार आहेत. महापालिकेच्या करारनामा नुसार कचरा ठेकेदाराने सर्व प्रभागांमध्ये तीन ते चार विविध घंटागाड्या व जवळपास ३५ ट्रॅक्टर लावून स्वच्छता करणे अभिप्रेत होते. कारण ही अत्यावश्यक सेवा आहे. यासाठी धुळे महानगरपालिकेने एकूण  नव्या ७९ घंटागाड्या , ४ ट्रॅक्टर, १ झुला गाडी, १ जेसीबी इत्यादी कचरा ठेकेदाराला वापरण्यासाठी दिली.सदर गाड्या, ट्रॅक्टर या अतिशय सुसज्ज आणि नवीन कोऱ्या गाड्या होत्या. परंतु आज गेल्या दोन वर्षापासून ७९ घंटागाड्यापैकी  ५७ घंटागाड्या  बंद आहेत .आज फक्त २२ घंटागाड्यांवर कचरा संकलन केले जाते.यामुळे  धुळे शहरातील प्रत्येक कॉलनीत घराजवळ जवळपास १५ ते २५ दिवसानंतर घंटागाडी येत आहे. धुळे शहराचे एकूण ३५ ट्रॅक्टर आवश्यक असून फक्त १० ट्रॅक्टर चालू आहेत. जवळपास २५ ट्रॅक्टर बंद आहेत. धुळे महानगरपालिका जनतेच्या पैशावर कचरा ठेकेदाराला सुका कचऱ्यासाठी १६५० रुपये प्रति टन, गटाराच्या गाळासाठी २५०  प्रति टन , डबर विटा बांधकाम साहित्यासाठी ५० रुपये प्रति टन  प्रमाणे अदा करीत आहेत. परंतु मनपाने दिलेल्या ७९  घंट्यागाड्यापैकी जवळपास ५७ घंटागाडी बंद आहेत.त्यापैकी २५ घंटागाडींचे टायर ट्यूब, बॅटरी व इतर साहित्य चोरीला गेलेले आहेत.किंवा ठेकेदाराने गायब केलेले आहेत . भंगारात पडलेल्या ह्या गाड्या आपल्याला डेपोवर व शहरातील इतर भागात दिसून येतात.त्याचप्रमाणे ट्रॅक्टरचे इतर साहित्य लंपास करण्यात आलेले आहे.कचरा संकलनाचे कामाची वेळ  सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आहे . परंतु सदर ठेकेदाराने कोणतीही पूर्व सूचना न देता मार्च महिन्यापासून ट्रॅक्टरची सेवा बंद केलेली आहे. अशा अनेक पुराव्यासहित आयुक्त दगडे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.यावेळी रणजीत राजे भोसले , जगन बापू ताकटे , डी टी पाटील,शेख युसुफ, अशोक भाई धुडकर, भीका नेरकर ,राजू सोलंकी, सोनू गुजर,रामेश्वर साबरे , निखिल मोमया ,जितू पाटील,दीपक देसले, मंगलदास वाघ, दीपक देवरे,भोला सैंदाणे,स्वामिनी पारखे, उजेर  शेख ,राजेंद्र चौधरी, चिराग देसले,धनंजय पाटील, बंटी वाघ, आदी उपस्थित होते.