पहेलगाम आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रेतून हजारोंच्‍या संख्‍येने विरोध प्रर्दशन करणार

 


  जळगाव : दि. 26: भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी मागील  2 महिन्‍यांन पासून कार्यकत्‍यांच्‍या अहोरात्र परिश्रमाने पूर्णत्वास आली आहे दरम्‍यान  पहेलगाम येथील धर्म विचारुन 26 हिंदुंची हत्‍या केली. या मुस्‍लीम आंतकवाद बाबत समस्‍त हिंदू मध्‍ये प्रचंड आक्रोश आहे. 

 निष्‍पाप पर्यटकांचे निर्दयतेने झालेल्‍या हत्‍याकांडाच्‍या  पार्श्वभूमीवर जन्मोत्सव शोभायात्रेत काही बदल करण्यात आले आहेत. या मध्‍ये प्रती वर्षी प्रमाणे शोभायात्रा वाजत गाजत न निघता ढोल - ताशे बंद ठेवून “ढोल नही अब तोफ बजेगी, प्रतिशोध की आग जलेगी”  धर्म पूछ कर मारा था अब धर्म बताकर मारेंगे अशा घोषणा चे फलकांसह घोषणा देत, हजारोंच्‍या संख्‍येने डोक्‍याला काळे फित बांधून कोणतेही वाद्य न वाजवता शोभायात्रा नेताजी सुभाष चंद्र बोस चौक ते शास्‍त्री टॉवर मार्गे  नेहरु चौक पर्यंत निघणार आहे. या शोभायात्रे मध्‍ये समाजातील बहुसंख्‍येने ज्ञाति बंधू भगिनीनी एकजूट दाखवून प्रचंड संख्‍येने सहभागी व्‍हावे असे आवाहान अध्‍यक्ष आर्कि.श्री. नितीन पारगांवकर व महिला अध्‍यक्ष वृंदा भालेराव यांनी केले आहे.

शोभायात्रा खान्‍देश सेंट्रल लॉन येथे पोहचल्‍यावर समापना वेळी प्रतिवर्ष अनुरुप परम पवित्र भगव्‍या ध्‍वजास ढोल वादनाने मानवंदना दिली जाईल. या नंतर  भगवान परशुराम प्रार्थना होवून ह.भ.प. दादामहाराज जोशी यांचे आशिर्वचनानंतर भगवान श्री परशुरामाची महाआरती होईल. या निमित्त 5000 ज्ञाति बांधवांकरीता महाप्रसादाने समापन होणार आहे. 

यंदा जन्मोत्सवात रविवार, दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. स्व बलदेव उपाध्याय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर पोलीस मल्‍टी पर्पज हॉल येथे आयोजित केलेले आहे.  सकाळी 8 ते  ११ पर्यंत आयोजित केले आहे जास्‍तीत जास्‍त संख्‍येने रक्‍तदान करण्‍याचे आवाहन केले आहे. सांय .५ वा महाबळ चौकातुन विराट मोटर सायकल रॅली पहेलगाम  आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ घोषणा देत निघणार आहे. दुचाकी रॅली मध्‍ये देखील हजारोंच्‍या संख्‍येने सहभागी होण्‍याचे आवाहन करण्‍यत आलेले आहे. 

जिल्हाभरात देखील परशुराम जन्मोत्सव साजरे व्हावे म्हणुन यंदा ९ तालुक्यांना भगवान परशुरामांच्या कायम स्वरुपी मुर्ती देण्यात येऊन जिल्‍हात सर्व ठिकाणी देखील भव्य शोभायात्रेतचे आयोजनात आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ काळया फिती लावून समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी दिली. बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने पोलीस मल्टी पर्पज हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यमान अध्यक्ष प्रतिथयश वास्तू विशारद नितीन पारगावकर,महिला संघाच्या अध्यक्षा  वृंदा भालेराव,प्रसिध्‍दी प्रमुख मनीष पात्रीकर,  सचिव राजेश नाईक,  सचिव  अजंली हांडे, पंकज पवनीकर,सुरेंद्र मिश्रा,तुषार देशपांडे, परेश पाठक उपस्थित होते.