काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड अतिरेकी हल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर समाजवादी पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की , भारत भुमीतील काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटन करायला गेलेल्या निष्पाप भारतीय नागरिक लोकांना काही अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. सर्व निष्पाप लोकांबद्दल आमच्या मनात सहानुभूती व संवेदना असून , ही घटना संपूर्ण मानवतेला काळिमा फासणारी आहे. व प्रत्येक मानवाला जीवन जगण्याचा अधिकारा पासून वंचित करणारी घटना असून या भ्याड हल्यात निष्पाप बळी गेलेल्या लोकांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करत आहे. या हल्याच्या निषेध करीत आहे.यावेळी माजी नगरसेवक अमिन पटेल, जामिल मन्सुरी , शहराध्यक्ष गुड्डू काकर ,इमरान शेख, अकिल अहमद अन्सारी, ईनाम अहेमद सिद्दिकी, नेहाल अन्सारी, अशपाक पिंजारी, ईरफान शाह ,रशीद शाह,गुलाम कुरेशी ,नवाब खान , नाजीम शेख, नवीद अख्तर अन्सारी , मोनीन अन्सारी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Social Plugin