आज पारोळा - कसोदा रस्त्यावरील मंगरूळ परिसरात एक दुर्दैवी अपघात घडला. या वेळी खासदार स्मिताताई वाघ पारोळा येथून कसोदा (आडगाव) येथे एका कार्यक्रमासाठी जात होत्या. मार्गात असतानाच त्यांना या अपघाताची माहिती मिळाली.स्मिताताईंनी क्षणाचाही विलंब न करता सदर अपघातस्थळी थांबून घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमींना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी विघ्नहर्त हॉस्पिटल, पारोळा येथे हलविण्याची व्यवस्था केली.या कार्यामध्ये शिवसेना तालुकाध्यक्ष मधुकर आबा (धूळपींप्री) यांनी सहकार्य केले...
सामान्य जनतेच्या संकटात तत्काळ धावून जाणारी, संवेदनशील आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्मिताताई वाघ यांचा हा कृतीशील नमुना कौतुकास्पद आहे.

Social Plugin