जळगाव प्रतिनिधी - वासुदेव जोशी समाज सेवा संघ व वासुदेव जोशी समाज बहुउद्देशीय संस्था यांचे संयुक्त विद्यमाने समाजातील दहावी बारावी मध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा गुण गौरव सोहळा नुकताच श्री गुरु गोरक्षनाथ समाज मंदिर जळगाव येथे पार पडला या सोहळयात वासुदेव, जोशी गोंधळी समाजातिल इयत्ता दहावी, बारावी, , अभियांत्रिकी, पदवी, पदवित्तर, परीक्षेत पास झालेल्या गुणवन्त विध्यार्थीचा मनिवरांच्या हस्ते सत्कार करण्यात् आला.
गुणगौरव सोहळा खालील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला समाज अध्यक्ष सदाशिव जोशी, समाज सेवा संघ अध्यक्ष आनंदा जोशी, किरण मोरकर प्रमोद जोशी. अनिल पवार,पांडुरंग शिंदे, सुनील कांनडे, विजय जोशी,अनिल जाधव, रवीद्र रणदिवे, अनिल दोरकर, रमेश विधाते,राकेश भोजने , भानुदास जोशी, रितेश जोशी, अनिल लागवनकर राजेश जोशी, निखिल जोशी, सचिन कानडे, गोपी बाबा, यांच्यासाह सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती सूत्रसंचालन श्री प्रमोद जोशी यांनी केले व आभार प्रदर्शन वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री अनंत जोशी यांनी केले

Social Plugin