भुसावळातील दोन अट्टल गुन्हेगार हद्दपार उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांनी केली कारवाई.

 

भुसावळात कायदा व सुव्यवस्था,  शांतता अबाधित ठेवण्यासाठी भुसावळचे उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील साहेब यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. संबंधितांवर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांना अनुक्रमे एक वर्ष आणि सहा महिन्यांची हद्दपारीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात शाकिर ऊर्फ गोलू शेख रशीद (वय २९, रा. विवेकानंद शाळेमागे, भुसावळ) याला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. परत येण्याकरिता

शासनाची किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची लेखी परवानगी आवश्यक आहे.

दुसऱ्या कारवाईत, शेख सलीम शेख हमीद (वय ५८, रा. पापानगर, भुसावळ) याच्यावरही गंभीर गुन्हे नोंद असल्याने त्याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यालाही तत्काळ जिल्ह्याबाहेर जाण्याचे आदेश दिले आहेत. नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.