महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर होणार आहेत. नवीन प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे जळगाव शहरात आजी माजी नगरसेवक आप आपल्या वार्डात कडक लक्ष देऊन असून भावी नगरसेवक मात्र नागरिकांच्या समस्या जाणून घेत आपले व्हिजन जनतेसमोर ठेवत आहेत. जळगाव शहरातील ऍड नरेंद्र अण्णा भास्कर पाटील यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते पियुष पाटील हे देखील आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे.
घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने वडील नरेंद्र भास्कर पाटील यांचा सामाजिक तसेच राजकीय वारसा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी माजी नगरसेवक अॅड. नरेंद्र भास्कर पाटील यांचे चिरंजीव पीयूष पाटील यांनी केली आहे. मागील निवडणुकीत भाजपकडून अनिल पगारिया आणि राष्ट्रवादीकडून रहिम तडवी यांनी निवडणूक लढवली होती. आता भाजप नेमका कोणता संभाव्य चेहरा या प्रभागात उतरवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे प्रभाग क्र. 5 मध्ये पीयूष पाटील यांची झालेली एंट्री आजी माजी नगरसेवकांना भारी पडणार असल्याची चर्चा जोरधरू लागली आहे.

Social Plugin