जळगाव शहरात चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी वंचीत आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार यांनी आज पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शहरात अनेक ठिकाणी अवैध दारू, मटका, गुटखा विक्री आणि इतर गैरकृत्ये चालू आहेत, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या संदर्भात, अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे, ज्यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे
अवैध धंद्यांमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध धंद्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे अवैध धंदे चालवीणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अवैध धंदे बंद करावे अश्या मांगणीचे निवेदन जितेंद्र केदार यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

Social Plugin