किरकोळ व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका: असो ऑफ बिजनेस ॲण्ड कॉमर्स संघटनेने शासनाकडे मागणी.

 



अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत व्यापाऱ्यांना संरक्षण देणारा हक्क अबाधीत  ठेवा, किरकोळ व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका अशी मागणी असोसिएशन ऑफ बिजनेस ॲण्ड कॉमर्स धुळे या संघटनेने शासनाकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांच्यासह व्यापाऱ्यांनी निदर्शने करून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने आखून दिलेल्या कायद्याच्या चौकटीत प्रत्येक व्यापारी व्यापार करीत असतो. अन्न सुरक्षा  मानके कायद्यांतर्गत कलम  ४६(४) चा व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचा हक्क अबाधीत  आहे.एखाद्या अस्थापनेवरून खाद्यपदार्थाचा नमुना घेतल्यास प्रयोग शाळेत तपासणी करून अहवाल येईपर्यंत अस्थापना सिल करण्याचा अधिकार कोणत्याही कायद्यात नाही.परंतु अक्कलकुवा जि. नंदुरबार येथे एका खाद्यतेल व्यवसायिकाचे अन्न नमुने संकलित केल्यानंतर ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. नमुने अप्रमाणित  असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. यानंतर व्यवसायिकाने फेर विश्लेषणासाठी अपिल दाखल केले. या प्रकरणाबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्नही विचारला गेला. म्हणून अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत ४६(४) चा अपील करण्याचा व्यापाऱ्यांचा हक्क अबाधीत ठेवा अशी मागणी  संघटनेचे अध्यक्ष  सुभाष  कोटेचा उपाध्यक्ष गोकुळ बधान , सचिव किशोर अग्रवाल, खजिनदार सुधाकर पाचपुते, राम    रोहिरा , मुस्तफा बुरहानी, विजय अग्रवाल, विक्की कुकरेजा , संदीप जैन यांनी केले आहे.