मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षा फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप.

 


महाराष्ट्रा राज्याचे कर्तव्य दक्ष  लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रम राबवून राज्यभर साजरा करण्यात येत आहे.   त्या अनुषंगाने दक्षा फाउंडेशनच्या वतीने आज २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पिंप्राळा येथील ग्रामविकास विद्यालय, सोमाणी मार्केट, तसेच पांडुरंग मुरलीधर मुंडडे हायस्कूल येथे दक्षा फाउंडेशन मार्फत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याचबरोबर दक्षा फाउंडेशनच्या पर्यावरणाच्या राक्षणासाठी पिंप्राळा परिसरातील गणपती नगर भागात 200 झाडे लावण्यात आली. या प्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. 

यावेळी जिल्हा महानगर अध्यक्ष श्री दीपक सूर्यवंशी दक्षा फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ मीनाक्षी आशिष सपकाळे,  मंडळ अध्यक्ष अतुल बारी समाजसेवक श्री आशिष सपकाळे शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एस कुमावत, श्री जोगी सर, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, विजय पाटील, सरचिटणीस श्री.उमेश सुर्यवंशी, संदीप मराठे, माजी मंडलाध्यक्ष श्री. शक्ती महाजन,श्री.चंद्रशेखर पाटील,महिला मोर्चा च्या सौ. रेखाताई कुलकर्णी, सौ. शुभांगी बिऱ्हाडे,सौ. स्मिता वेद, शिवा पुरोहित राजू डोंगरे हरिओम सूर्यवंशी खुशाल ठाकूर  सौ. मंदाताई सोनवणे,सौ. जयश्री पाटील, सौ. गीता शुक्ला, सौ. माधुरी हांडे (देशमुख) मंडल पदाधिकारी , राज कोळी,राहुल लोखंडे, संजय तायडे,किरण भोई, अनुराज मराठे, नूर भाई, अंकित कोष्टी, जीभाऊ वानखेडे,व कार्यकर्ते व कार्यकर्ते उपस्थित होते. 



दक्षा फाउंडेशनच्या वतीने नेहमीच शहरात आरोग्य विषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.