महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवणीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पिंप्राळा परिसरातील भाजप मंडळ क्र. 5 मध्ये जळगाव शहराचे लाडके आमदार श्री.सुरेश दामू भोळे ( राजुमामा ),भाजप जळगांव महानगर जिल्हाध्यक्ष श्री.दीपक सूर्यवंशी, श्री.विशाल त्रिपाठी रक्तदान शिबिराचे संयोजक श्री. सागर जिजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज २२ जुलै रोजी सकाळी 9 वाजता जळगावातील पिंप्राळा येथील बाजारपट्टा येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सौ. सरिता बारी, रूपेश सपकाळे,श्री. शांताराम बारी यांच्यासह ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भाजप मंडल क्र.५ पिंप्राळा परीसराचे अध्यक्ष श्री. अतुल बारी, सरचिटणीस श्री.उमेश सुर्यवंशी, संदीप मराठे, माजी मंडलाध्यक्ष श्री. शक्ती महाजन,माजी नगरसेवक श्री.सुरेश सोनवणे,श्री.विजय पाटील, श्री.चंद्रशेखर पाटील,महिला मोर्चाच्या सौ. रेखाताई कुलकर्णी, सौ. शुभांगी बिऱ्हाडे,सौ. स्मिता वेद, सौ. मंदाताई सोनवणे,सौ. जयश्री पाटील, सौ. गीता शुक्ला, सौ. माधुरी हांडे (देशमुख) मंडल पदाधिकारी दक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. मीनाक्षी सपकाळे श्री.आशिष सपकाळे, राहुल पाटील, राज कोळी,राहुल लोखंडे, संजय तायडे,किरण भोई, अनुराज मराठे, नूर भाई, अंकित कोष्टी, जीभाऊ वानखेडे,व कार्यकर्ते उपस्थित होते.

Social Plugin