पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुंदर भारत..स्वच्छ भारत.. या उपक्रमाखाली मा. श्रीमती रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्य मंत्री युवा कल्याण क्रीडा विभाग भारत सरकार )स्वतंत्र दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2025 रोजी तहसील कार्यालय व परिवर्तन चौक मुक्ताईनगर येथे प्लास्टिक मुक्त कॅरीबॅग मुक्त होण्यासाठी मुक्ताई पॅलेस( कॅन्टीन ) व जय महाराष्ट्र हॉटेल जावरे परिवार यांच्यावतीने ऑफिशियल कॉटन पिशवी वाटप करण्यात येणार आहेत. सदर पिशवीचे प्रकाशन करताना श्रीमती रक्षाताई खडसे, अतुल भाऊ जावरे, संजय भाऊ माळी,तुषार भाऊ राणे, उमेश भाऊ राणे, प्रशांत भाऊ राणे, गजानन भाऊ नालट, नितीन चौधरी सर, विनायक भाऊ पाटील, कुमार भाऊ कोळी, सौरभ भाऊचौधरी, गणेश भाऊ झोपे, पंकज भाऊ झांबरे, गणेश भाऊ कोळी इतर मान्यवर उपस्थित होते.

Social Plugin