अंगणवाडी कर्मचारी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न.

 


महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा धुळे येथील  सैनिक भवन येथे आयोजित करण्यात आली होती.या सभेत गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविका व मदतनिसांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ श्रेणी लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युईटी देण्यात यावी.याबाबत कायदेशीर कार्यवाही बाबत ऍड. एस. बी पाटील, यांनी मार्गदर्शन केले.या सभेत प्रियांका पाटील, पुष्पा परदेशी ,चेतना गवळी ,मनिषा मोरे ,नयना मराठे, यांनी आपले मनोगत व्यक्त करत.सेविका मदतनिसाना एकजूट राहण्याचे  आव्हान केले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि संघटनेने केलेली आंदोलने तसेच अन्य विषयांवर उपस्थित सेविका मदतनीसांना युवराज बैसाणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. न्यायालयाच्या निकालानुसार सेविका मदतनीस यांना कायदेशीरपणे लाभ मिळवून देण्यासह संघटनेच्या अन्य महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करून महत्वपूर्ण ठराव या सभेत एक मताने मंजूर करण्यात आला होता.यावेळी संध्या पाटील , ऍड . एस.बी पाटील , ऍड .चैतन्य  बर्गे ,युवराज बैसाणे, राजू पाटील,नयना मराठे , आशा जाधव ,सुनंदा नेरकर ,लता गावित, संगीता जाधव, भारती खैरनार,इंदिरा पाडवी, पुष्पा परदेशी,सुनिता कोकणी, सुनंदा सोनवणे आदीसह महिला भगिनीं उपस्थित होते.या सभेचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक रामकृष्ण पाटील, यांनी केले.तर आभार अमोल बैसाणे यांनी मानले होते.