कृषीमंत्री कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन राष्ट्रवादीने पत्ते खेळून कृषीमंत्र्यांचा केला धिक्कार.


कृषीमंत्री माणिकराव कोकाटे  विधान भवनामध्ये  पत्त्यांचा रमी डाव खेळत असल्याने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष मार्फत रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा धुळे येथे आंदोलन करून कृषीमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला व त्यांचा राजीनामा मागितला.

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणाने कुप्रसिद्ध झाले आहेत.मध्यंतरी त्यांनी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना अरेरावी केली.शेतकरी मुलांच्या लग्नांमध्ये पैशांची उधळपट्टी करतात.असे बेताल वक्तव्य केले. स्वतःच्या घर खरेदीमध्ये त्यांनी सामान्य लोकांची फसवणूक केली.या सर्व कारस्थानामुळे कृषी मंत्री हे बदनाम झालेले आहेत.या कृषी मंत्री मुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात  नाराजी आहे.त्यांनी एक रुपया विमा सुद्धा बंद केला. एवढ्यावर न थांबता विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्यांचा रमी गेम खेळत होते.हा शेतकऱ्यांचा थट्टा आहे.हा एक प्रकारे सत्तेचा माज आहे. शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात कुठल्याही प्रकारच्या आपुलकी नाही.अशा कृषी मंत्री सत्तेवर राहणे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला. व त्यांचा राजीनामा मागितला.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यावर आल्यास  त्यांचे पत्त्यांचा हार देऊन स्वागत करण्यात येईल.असाही इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले,नंदू येलमामे , भिका नेरकर,अशोक धुळकर ,दीपक देवरे,यशवंत पाटील,अमित शेख, राजेंद्र सोलंकी,मंगलदास वाघ, जितू पाटील,चिराग देसले, भटू पाटील,राजू चौधरी, डी टी पाटील, निखिल मोमया , नूर शाह, उजैर शेख,राजू मशाल, संजय नेतकर , जगन बापू ताकटे,सोनू गुजर, कल्पेश मगर, गोलू नागमल , सोनू घारु,इतर सहकारी , कार्यकर्ते ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.