अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी धुळ्याचे सुनील नेरकर यांची सर्वानुमते पुनश्च निवड करण्यात आली. संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक रविवार दि.२० जुलै रोजी धुळे शहरातील हॉटेल गोल्डन लीफ येथे पार पडली. या बैठकीत सुनील नेरकर यांच्यावर सर्वांनी विश्वास व्यक्त करीत सर्वानुमते नेरकर यांची पुन:श्च राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीचा मान पहिल्यांदाच धुळ्याला मिळाला आणि धुळ्यालाच राष्ट्रीय अध्यक्षपद पुन:श्च मिळाल्याने दुग्धशर्करा योग्य जुळून आला.बैठकीत संस्थेच्या नवीन राष्ट्रीय कार्यकरणीचे पदाधिकारी संचालक यांची निवड घोषित करण्यात आली. तत्पूर्वी बैठकीत विविध विषयांवर विचार मंथन करण्यात आले.या बैठकीला ११ राज्यातील राष्ट्रीय अध्यक्ष, पाचशेवर मान्यवर उपस्थित होते.सुनील नेरकर यांच्यासह संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरोडे ,प्रदेश कार्यवाहक अजय कासोदेकर, प्रदेश समन्वयक विवेक वाणी, विविध आघाडीचे अध्यक्ष रविंद्र मालपुरे ,भूषण सोजे ,प्रशांत ब्राह्मणकर,धुळे शहराध्यक्ष पवन खानकरी ,दिलीप पाखले, आदी उपस्थित होते.यावेळी सुनील नेरकर यांनी वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या या बैठकीत संयोजन अतिशय उत्कृष्टपणे केलं होतं .संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. देशभरात वाणी समाज समाजात एकूण २६ पोट जाती असून त्यापैकी ५ पोटजाती एकत्र आणण्यास संस्थेला यश आले आहे.आणखी बऱ्याच पोटजाती एकत्र आणावयाच्या आहेत.या बरोबरच वाणी समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला गेला. अनेक आंदोलन केली.अखेर त्यास देखील यश मिळाले. बैठकीच्या पहिल्या सत्रात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विविध राज्यातील अध्यक्ष पदाधिकारी निवडले गेले. याबरोबरच समाजातील तरुणांना रोजगार, वैवाहिक समस्या, महिलांना गृह लघु उद्योगासाठी मदत करणे, शैक्षणिक संस्था सुरू करणे , समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान करणे, समाज संघटनासाठी प्रयत्न इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करून संस्थेच्या पुढील वाटचालीची दिशा ठरविण्यात आली. भविष्यात संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या गरज लक्षात घेऊन विविध विषयांवर लक्षवेधी आणि मोठे व्हिजन ठरवून काम करणार असल्याच सुनील नेरकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं.

Social Plugin