बंटी खोपडे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या पोलीस प्रशासनाकडे नागरिकांची मागणी



शहरातील चाळीसगावरोड  पश्चिम हुडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक दीपक उर्फ बंटी खोपडे यांच्यासह इतरांवर चाळीसगावरोड पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र या गुन्हा संदर्भात एफ.आय.आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे दि.२० रोजीची कोणतीही घटना कधीही  घडलेली नव्हती .तसेच बनावट व बोगस घटनाक्रम तयार करून एफ.आय. आर दाखल करण्यात आलेली आहे. सदर चाळीसगाव रोड पश्चिम हुडको भागातील राजकीय पुढारी यांनी बंटी खोपडे यांची सामाजिक कामे व त्यांची वाढती लोकप्रियता खटकत असल्याने तसेच बंटी खोपडे हे येणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गजेंद्र अंपळकर व त्यांचे पॅनलचे विरुद्ध उभे राहणार असल्याने त्यांना खोटे गोवण्याची तयारी सुरू आहे. सदर प्रकरणात भाडोत्री महिलेला उभे करून खोटी केस स्वतःच्या पदाचा व राजकीय वर्चस्वाचा दुरुपयोग करून राजकीय हेतू साध्य करण्याकरिता दाखल करून घेतलेली आहे. तसेच एफ. आय.आर मध्ये जाणूनबुजून केवळ टोपण नाव अथवा पहिले नाव नमूद केलेले आहे.केवळ टोपण नावाचे अनुषंगाने पोलीस हे दीपक सुरेश खोपडे यांना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी यांच्या दबावामुळे व सांगण्यावरून सदर  गुन्ह्यात खोटेपणाने गोवण्याच्या  तयारीत आहेत.सदर गुन्ह्याचा तपास हा राजकीय बडा पुढारी यांच्या दबावाने व सांगण्यावरून सुरू आहे. बंटी खोपडे हे शेती व दुग्ध व्यवसाय करीत असून ते इनकम टॅक्स पेअर आहेत.तरी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये गु. र . नंबर १३८/ २०२५ बी. एन.एस कायदा २०२३ चे कलम ७४,७६,३१०(२),१८९(२),१९१(२), ३५२,३५१(२),३ (५) प्रमाणेचा खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी खोपडे परिवारासह परिसरातील महिला भगिनींनी जिल्हाधिकारी  व जिल्हा पोलीस अधीक्षकांनकडे मागणी केली आहे.