धुळे येथील सराईत गुन्हेगार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

 


जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. श्री, डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ कविता नेरकर, यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या.  त्याअनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकास त्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या. 


3 जुलै रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहीती मिळाली की, भडगांव पोलीस स्टेशन हद्दीत शेख इमरान शेख रफिक रा. ग्रीन पार्क कॉलनी भडगांव हा व त्याचे सोबत एक इसम हे मोटारसायकल चोरी करीत आहेत. मिळालेल्या माहिती नुसार त्यांनी सदर गोपनीय माहीती बाबत कारवाई  करण्यासाठी पथक नेमले होते.  त्यावरुन सदर पथकाने वरील आरोपी हा पाचोरा शहरात येणार असल्याचे गोपनीय माहीती काढली, व त्या अनुशंगाने सापळा रचुन त्यास व त्याचे सोबत असलेल्या इसमांस अंमलदारांनी जागीच पकडले.  त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) शेख इमरान शेख रफिक वय २४ ह.मु. ग्रीन पार्क कॉलनी भडगांव रा. अंबिकानगर शंभर फुटीरोड धुळे ता.जि.धुळे, २) शेख अकिल शेख शफिक वय २७ रा.जलाली मोहल्ला, भडगांव ता. भडगांव जि. जळगांव असे सांगुन त्यांची अजुन कसून चौकशी केली असता,  त्यांनी भडगांव शहरात विजय हॉटेलच्या समोरुन तसेच खोल गल्ली भडगांव येथे सलुनच्या दुकानासमोरुन अशा दोन ठिकाणांवरुन एच एफ डीलक्स हिरो कंपनीची, बजाज कंपनीची प्लेंटीना अशा दोन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले.  त्याबाबत भडगांव पोलीस स्टेशन वरुन सदर ठिकाणी मोटारसायकल चोरी बाबत गुन्हे दाखल आहे का अशी चौकशी केली असता, भडगांव पोस्टे गुरनं. २२६/२०२५ BNS ३०३ (२), गुरनं. २५०/२०२५ BNS ३०३(२) असे दोन गुन्हे दाखल असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती.  सदर आरोपीतांना अजुन विचारपुस करुन माहीती घेतली असता आरोपी क्र. १) शेख इमरान शेख रफिक वय २४ ह.मु. ग्रीन पार्क कॉलनी भडगांव रा. अंबिकानगर शंभर फुटीरोड धुळे ता. जि. धुळे याचे कडेस अजुन एक अॅक्टीव्हा सारखी काळ्या रंगाची मोपेड मोटारसायकल आहे. बाबत कळवीले तसेच सदर आरोपी याचेवर धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.  सदर आरोपीतांना पुढील योग्य त्या कारवाई साठी भडगांव पोलीस स्टेशन ला हजर केले आहे.


सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक श्री. शेखर डोमाळे, पो.हे. कॉ, लक्ष्मण पाटील, पो.हे.कॉ. संदिप पाटील, पो.ना. राहुल पाटील, पो.कॉ. जितेंद्र पाटील, पो.कॉ. भुषण पाटील अशांनी कारवाई केली आहे.