मेथी खदान कागदपत्रांमधील अफरातफरीची चौकशी करून न्याय द्या - शानाभाऊ सोनवणे

 



मेथी ता.शिंदखेडा गावाच्या शिवारातील खदानीच्या  कागदपत्रांमध्ये अफरातफर झाली आहे. खदानीचे परवानगीचे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आहे.त्यामुळे या अफरातफरीची  चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख  शानाभाऊ सोनवणे यांनी केली आहे.

मेथी गावच्या शिवारातील खदान रद्द व्हावी म्हणून शेतकरी गेल्या १३ दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत.प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे .त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे.त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सत्यता तपासून निर्णय घ्यावा. खदानीची परवानगी बनावट कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आली आहे. चुकीचे पंचनामे व जबाब या सर्व बाबी तसेच पर्यावरण संदर्भातील तथा भूजल सर्वक्षण रिपोर्ट हे कायद्याला अनुसरून नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.मंडळाधिकारी यांनी घेतलेले चतुसिमा लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जबाबात ७ जबाब धारक हे १० ते ४० वर्षाच्या आसपास मृत्यू झालेले आहेत. असे जबाब त्या संदर्भात चौकशी व्हावी .११ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायत मेथीचे नाहरक पत्र हे बनावट खोटे बनवले आहे. उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी दि.७ जुलै रोजी रात्री ११ वाजता ६ ब्रासचे  ४ डंपर , दोन  पोकलॅन   रात्री बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करताना पकडले व ते मंडळाधिकाऱ्यामार्फत जागेवर पंचनामा करून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले होते.ते कसे सुटले व कायदेशीर कार्यवाही काय झाली, त्याचा खुलासा व्हावा या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेवून आमरण उपोषणाची सांगता प्रशासनाने केली.अन्यथा शिवसेना उबाठाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शानाभाऊ सोनवणे, संदीप मिस्तरी ,जगदीश गोसावी,सदाशिव भिल , हरी सोनवणे,पांडुरंग सोनवणे, मेहुल परमार,रमेश माळी,ईश्वर आगळे,विनोद सोनवणे ,विजय गोसावी,योगेंद्र भिल, सुनिल परमार, यांनी दिला आहे.