प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले कामबंद आंदोलन.

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या नेतृत्वात हा संप पुकारण्यात आला आहे.या संपाबाबत .माहिती देताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची ८ जुलैला प्रत्यक्ष भेट घेतली होती.त्यांनी मुख्यमंत्री व आरोग्य विभागाची बैठक घेणार असल्याचे आश्वासीत केले होते.दरम्यान समितीतर्फे १० व ११ जुलैला मुंबईतील आझाद मैदान येथे दोन दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आरोग्य मंत्र्यांनी १५ जुलैला सर्वसमावेशक बैठक घेण्यात येईल असा असे आश्वासन दिले होते.त्यामुळे नियोजित २१ जुलै पासूनचे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले होते.आरोग्यमंत्र्यांच्या आश्वासनाप्रमाणे १५ जुलैला बैठक पार पडली.परंतु त्यात समायोजन प्रक्रियेबाबत काय निर्णय झाला ,यांचे इतिवृत्त समितीला अद्याप प्राप्त झालेले नाही.त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.समायोजन प्रक्रियेबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आजपासून बेमुदत आंदोलन कामबंद आंदोलन पुकारल्याचे यावेळी सांगण्यात आले.या आंदोलनात अध्यक्ष विलास वारुळे, अमिता आठवले,निलेश पाटील, श्रीमती रुपाली,कविता पाटील,कपिल जाधव,राजीव भामरे,नरेश बोरसे, अजय पाटील, संभा महाजन ,यांच्यासह   अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.