प्रसिद्ध विधीज्ञ सागर चित्रे ठरले रोटरीच्या 'बेस्ट प्रेसिडेंट' पुरस्काराचे मानकरी.

 



जळगावतील प्रसिद्ध विधीज्ञ सागर चित्रे यांना रोटरी क्लबचा  'बेस्ट प्रेसिडेंट' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे 

अकोला येथे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चा भव्य समारंभ ३ ऑगस्ट रोजी पार पडला. या समारंभात रोटरी क्लब जळगावने उल्लेखनीय यश मिळविल्याने एकूण १९ पुरस्कार प्राप्त केले. क्लबचे माजी अध्यक्ष अॅड. सागर चित्रे यांना "बेस्ट प्रेसिडेंट" या मानाच्या पुरस्काराने गौरविले. हा सन्मान माजी प्रांतपाल रोटे, राजिंदर खुराणा यांच्या हस्ते प्रदान झाला. याप्रसंगी प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, आशा वेणुगोपाल, राजे संग्राम सिंग भोसले, किशोर केडिया, डीजीई डॉ. राजेश पाटील उपस्थित होते.