कासोदा पोलीसांची कारवाई जुगार अड्ड्यावर छापा १५ जुगारी ताब्यात

 


कासोदा पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण १,२१,३९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  5 ऑगस्ट रोजी  कासोदा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक श्री. निलेश दिवानसिंग राजपुत  यांना जवखेडे सिम गावात गालापुर रोडला लागुन असलेल्या काटेरी झुडपाच्या आडोशाला काही इसम जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती. त्यानुसार  त्यांनी पो.ना. प्रदिप पाटील, पोकॉ समाधान तोंडे, पोकॉ निलेश नाना गायकवाड, पोकॉ योगेश अरुण पाटील अशांना तात्काळ कारवाई करण्यासाठी रवाना केले होते. सदर ठिकाणी पोलीस  पथक पोहचले असता,  काटेरी झुडपाच्या आडोशाला काही इसम खाली जमिनीवर बसून, घोळका करुन, पैसे टाकुन पत्याचा खेळतांना दिसले. त्यांचेवर 3 वाजून 25 वाजेच्या सुमारास छापा टाकून त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.


सदर पकडलेल्या ईसमांमध्ये १) सोनु धाकु भिल वय ५० वर्ष, २) विरभान श्रावण भिल वय-४० वर्ष, ३) राहुल संतोष सोनवणे वय-२६ वर्षे, ४) प्रविण वंसत सोनवणे वय-३९ वर्षे ५) संतोष माधव सोनवणे वय-३० वर्षे ६) सुनिल दगा ठाकरे वय-३५ वर्ष, ७) मंगिलाल भाईदास चव्हाण वय ४५ वर्ष, ८) रतन धाकु भिल वय-६० वर्ष, ९) अशोक गोविंदा पाटील वय-५४ वर्ष, १०) सचिन बापु पवार वय-३७ वर्ष, ११) कांतीलाल महादु सोनवणे वय-३८ वर्ष, १२) उत्तम बालाआप्पा जेहें वय ५० वर्ष, १३) समाधान बापु पाटील वय-३५ वर्ष, १४) संभाजी महारु पाटील वय ५८ वर्ष, १५) सुनिल सिताराम वाघ, वय ४८ वर्ष सर्व रा. जवखेडे सिम ता. एरंडोल जि. जळगाव अशांचा समावेश असून त्यांचे अंगझडती, पत्याच्या डावातुन ६,३९०/- रोख रक्कम व १,१५,०००/- रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली असा एकुण १,२१,३९०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण् यात आला असुन त्याचेवर पोकॉ दिपक देसले यांच्या फिर्यादी वरुन सदर इसमांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वरील कारवाई मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी सर, यांचे आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नेरकर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधीकारी  विजय ठाकुरवाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपुत पो.हे.कॉ नंदलाल परदेशी, पो.ना  प्रदिप पाटील, पो.कॉ समाधान तोंडे, पो.कॉ निलेश गायकवाड, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ  कुणाल देवरे, पोकॉ दिपक देसले, पो.कॉलहु हटकर अशांनी केली आहे.